आता आलेल्या माहिती नुसार श्रीरामपुरात वॉर्ड नं. २ येथील कुरेशी मोहल्ला जवळील एका ६० वर्षाच्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी दिली सदर रुग्ण कुरेशी मोहल्ला परिसरातील असून कोरोनाचे लक्षण जाणवू लागल्याने त्यांचे घश्याचे स्राव सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवले असता त्या रुग्णाचा अहवाल आता पॉसिटीव्ह आला. तसेच ५४ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. असे तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आता तरी श्रीरामपुर वासियांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे असे प्रशासनाच्या वतीने बोलले जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here