गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात करोनाचा उद्रेक झालेला आहे.कोरोना विषाणूने अहमदनगर जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधींला आज गाठले.

अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेतील एका आमदारांचा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.या आमदारांनी एका सरकारी कार्यालयात नुकतीच बैठक देखील घेतली होती.

कोरोनाबाधित अधिकाऱ्यासमवेत बैठकीला उपस्थित असलेल्या या आमदारानी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले होते, खबरदारी म्हणून त्यांनी कोरोना चाचणी केली त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला.

विद्यमान सरकारमधील असलेल्या या लोकप्रतिनिधीभोंवती कार्यकर्त्यांची देखील गर्दी असते.त्यामुळे लोकप्रतिनिधीच्या संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे.

या लोकप्रतिनिधीच्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांच्या शोधासाठी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा चांगलीच ढवळून निघाली आहे.दरम्यान, हे लोकप्रतिनिधी उपचारासाठी दाखल झाले आहेत.


राज्यात यापूर्वी अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती.

तसेच नाशिकमधील राष्ट्रवादीच्या महिला आमदाराला कोरोनाची लागण झाली होती. तर नांदेडच्या एका आमदाराला कोरोना झाल्याचं निष्पण्ण झालं होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here