श्रीरामपुर/ प्रतिनिधी (निलेश सोनवणे) :- श्रीरामपूर शहर व तालुक्यातील महावितरण कंपनीचे घरगुती व्यवसायिक औदयोगिक व्यापार ग्राहक असलेल्या सर्व ग्राहकांना महावितरण कंपनीने 3 महिन्याची वाढीव वीज बिले दिल्याने शहर व ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप होत आहे व झालेला आहे.शासनाने 3 महिन्यापूर्वी अचानकपणे लाँकडाऊन केल्याने संपूर्ण व्यापार दुकाने औदयोगिक क्षेत्र तसेच छोट्या मोठे व्यावसायिकांनी आप आपले व्यवहार सदर कालावधीत पूर्ण पणे बंद ठेवलेले होते. महावितरण कंपनीने बंद असलेल्या व्यवसायाचे देखील भरमसाठ बिल आकारलेले आहे कोरानाचे संकट व संचारबंदी व्यवसायिक व ग्राहक आर्थिक संकटात सापडलेले असतांना ही अव्वाच्यासव्वा रक्कमेची बीले महावितरणने पाठविल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. सर्व सामान्यानां एकत्रित बिल भरणे शक्य नसल्याने ते माफ करावे किंवा दंड व्याज व अन्य कोणतीही वाढीव आकाराणी करु नाही नवीन बिलामध्ये नव्याने वहन आकार १ रु १८ पै लावण्यात आला हे अन्यायकारक असे आहे असे म्हणत विविध संघटना पदाधिकारी व महिलांनी एकत्रित जमुन सोशल डिस्टींगचा वापर करुन कामगार नेते नागेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती राजे संभाजी चौकात महावितरणने पाठविलेल्या वाढीव बिलाची महिलांनी होळी केली व वेगवेगळ्या घोषणा देवून महावितरणचा निषेध करण्यात आला यावेळी बोलताना कामगार नेते नागेश सावंत म्हणाले की .या वाढीव वीज बिलाची त्वरित चौकशी करून वाढीव रक्कम आकारण्यात आलेली आहे ती त्वरित रद्द करून नियमाप्रमाणे पूर्वीसारखेच बील आकारुन सदर बिल भरण्यासाठी ५ टप्पे करून मिळावे अन्यथा विविध पक्ष संघटना व्यक्ती. संस्था हे उग्र स्वरुपाचे आदोलंन हाती घेवून “साहेबा साहेबा कायदा पाळ”असे आदोलंन करतील असा इशारा त्यांनी या प्रसंगी दिला यावेळी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता निलेश एस नागरे यांना निवेदन देण्यात आले त्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्याशी निवेदनातील मागण्याबाबत चर्चा करुन वीज बिला वाढीव रकमेबाबत योग्य ते निर्णय घेवू असे आश्वासन दिले.यावेळी मराठा स्वंयसेवक संघ ह्युमनराईट असोसिएशन फाँर प्रोटेक्शन. अध्यक्ष राजेंद्र भोसले. बी एम पवार. सचिन झिंजुर्डे. हरिष शिंदे. राजु यादव.सुनील इंगळे. चरणदादा त्रिभुवन. इम्रान शेख यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here