श्रीरामपुर/ प्रतिनिधी :- श्रीरामपुर शहरात काल आणखी तीन रुग्ण कोरोना पोजिटीव्ह आढळले यात आमदारांची पत्नी तसेच त्यांच्या गाडी चालकाचा समावेश आहे तर तिसरा रुग्ण हा वार्ड नं २ मधील असून आता बाधितांचा आकडा हा २५ वर गेला असून याबाबत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की येथील आमदाराचा अहवाल पोजिटीव्ह आला होता त्यामुळे त्यांची पत्नी व गाडी चालकांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्याचप्रमाणे वार्ड नं २ मधिल १ रुग्ण पोजिटीव्ह आढळला होता त्याच्या संपर्कातील एका व्यक्तीचा स्त्राव तपासणी साठी पाठविण्यात आला होता या तिघांचा अहवाल काल प्राप्त झाला त्यात तिघेही पोजिटीव्ह आढळून आले होते
अहवाल प्राप्त झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून काल प्रशासनाने वार्ड नंबर २ चा परिसर १८ जुलै पर्यंत हॉटस्पॉट पॉकेट म्हणून घोषित करण्यात आला असून संपूर्ण भाग सील करण्यात आला या परिसरातील नागरिकांना व वाहनांना ये-जा करण्यास प्रतिबंधक करण्यात आले रुग्णांच्या संपर्कातील ३६ संशयित व्यक्तींचे अहवाल येणे बाकी आहे ते आज रोजी प्राप्त होण्याची शक्यता आहे
श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे २५ रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.