श्रीरामपूर(प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे दिवंगत प्राचार्य रामदास बोरुडे सर यांच्या पुण्यतिथी निमित्त गेल्या चार वर्षांपासून बोरुडे कुटुंब सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम घेत असल्याची प्रतिक्रिया मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी दिली. यावेळी खोरे यांच्यासह नगरसेवक मनोज लबडे, ऍड.जीवन पांडे, मनोज परदेशी यांनी बोरुडे कुटुंबाचे आभार मानले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य रामदास बोरुडे यांचे गेल्या पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव अभियंता ऋषीकेश बोरुडे, पत्नी श्रीमती लता बोरुडे व सून डॉ.लीना बोरुडे यांनी त्यांच्या स्मरणार्थ समाजाला उपयुक्त असणारे उपक्रम पुण्यतिथीला करण्याचे ठरविले. पहिल्याच वर्षी बोरुडे कुटुंबाने चौधरी क्लिनिक ते गुजराथी मंगल कार्यालय रस्त्यावर सोलरवर चालणारे १० स्ट्रीट लाईट बसविले. आजही हे सोलर लॅम्प महावितरणची वीज असो अथवा नसो लख्ख उजेड देतात.
यंदाच्या पुण्यतिथीला कोरोनाच्या महामारीचा सामना करण्या-या नगरपरिषद आरोग्य विभागाच्या कर्मचारी वर्गास मास्क व सॅनिटायझर कर्मचारी दिलीप दांडगे, दत्तात्रय चव्हाण, सुनील शेळके यांचेकडे सुपूर्द केल्याची माहिती मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी दिली. सामाजिक जाणिवेचे भान राखत बोरुडे कुटुंबाने राबविणा-या श्रीमती लता बोरुडे मॅडम, ऋषीकेश बोरुडे, डॉ.लीना बोरुडे यांचा खोरे यांच्यासह नगरसेवक मनोज लबडे, ऍड.जीवन पांडे, मनोज परदेशी यांनी सत्कार करत आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here