करोनाचा संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनेचा भाग म्हणून गेली साडेतीन महिने बंद असलेली राज्यभरातील हॉटेल्स व लॉज ग्राहकांसाठी येत्या ८ जुलैपासून सुरू होणार आहेत. मिशिन बिगीन अगेन अंतर्गंत सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.


मुंबईः करोनाचा संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनेचा भाग म्हणून गेली साडेतीन महिने बंद असलेली राज्यभरातील हॉटेल्स व लॉज ग्राहकांसाठी येत्या ८ जुलैपासून सुरू होणार आहेत. मिशिन बिगीन अगेन अंतर्गंत सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत तसे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान लक्षात घेऊन हा उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद नागपूरसारख्या शहरांसाठी व महापालिका असलेल्या शहरांसाठी कन्टेंनमेंट झोनपासून बाहेर असलेल्या हॉटेलला परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉज हे यांच्या क्षमतेच्या ३३ टक्के ग्राहकांनाच राहता येणार आहे.

हे आहेत नियम

हॉटेलच्या क्षमतेनुसार फक्त ३३ टक्के ग्राहकांना संमती देण्यात येणार

रेस्तराँमध्ये फक्त राहण्याची संमती असेल

ग्राहकांचे थर्मल स्क्रिनिंग करणं आवश्यक

सॅनिटायझरचा वापर सक्तीचा असणार आहे.

हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये असलेले गेमिंग झोन, स्विमिंग पूल आणि जिम बंद राहणा

हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी मास्कचा वापर बंधनकारक

अटी शर्तीसह परवानगी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी हॉटेल्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत हॉटेल्स सुरू करण्यासाठी सशर्त मंजुरी देण्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार काही अटी- शर्तींसह आज हॉटेल सुरू करण्याला परवानगीही देण्यात आली आहे. हॉटेल्स तसेच लॉजेस सुरू करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल याची खात्री करण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करावी लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here