श्रीरामपुर / प्रतिनिधी :- श्रीरामपुर मधील फरीद राजू शेख याला अटक केली असून त्याला न्यायालयाने १३ जुलैपर्यंत वनकोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. वन विभागाने शेखकडून अजगर, मन्यार, डुरक्या घोणस व तस्कर आदी साप ताब्यात घेतले आहेत. सहायक वनसरंक्षक रमेश देवखिळे यांनी माहिती देताना सांगितले, श्रीरामपुरात सापांची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यावरुन देवखिळे यांचेसह देविदास पातारे, मोबाईल पथकाचे थिटे, वनरक्षक गाडे, अरविंद सूर्यवंशी, बाळासाहेब सुंबे यांच्या पथकाने सापळा रचून मसाले गल्लीत राहणार्‍या फरीद राजू शेख याच्या राहत्या घरी छापा घातला. त्यावेळी सखोल चौकशी केली. त्याच्याकडून अजगर, मन्यार, तस्कर, डुरक्या घोणस आदी साप ताब्यात घेतले. आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला १३ जुलैपर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here