राहता / प्रतिनिधी :- राहता तालुक्यातील शिर्डी नगरपंचायत येथील मनसे नगरसेवक दत्तू कोते हे अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून गोर – गरीब लोकांची सेवा व त्यांना मदत करण्याचे काम करत असतात तसेच कुठल्याही स्वरूपाची राजकीय वारसा नसताना माननीय हिंदू जन नायक राजसाहेब ठाकरे यांच्या विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून विविध स्वरूपाचे आंदोलने करून भागातील प्रश्न व नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम मोठ्या प्रमाणात करत असतात या कामाच्या जोरावर व जनतेने केलेल्या सहकार्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आले होते समोरील उमेदवार धनदांडगा असताना सुद्धा सर्वसामान्य माणूस निवडून आल्याने काही राजकीय लोकांना ते देखावले गेले नाही त्यामुळे काही राजकीय लोकांनी कट कारस्थान करून दत्तू कोते यांचे एक वर्षापूर्वी अपहरण करून घातपात करण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने दत्तू कोते त्यांच्या तावडीतून निसटले व त्यानंतर त्यांनी रीतसर पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केला त्या अनुषंगाने पोलिसांनी अपहरणातील आरोपींना अटक केले परंतु त्याच्या मागचा मास्टर माईंड खरा सूत्रधार कोण याचा शोध लागला नाही किंवा लावला नाही जे आरोपी पकडले त्यांची आणि दत्तू कोते यांची ओळख नाही कधी वाद नाही त्यामुळे त्यांनी स्वतःहून अफरण करण्याचे काही कारणच नाही अफरण केले त्यावेळेस त्यांनी दत्तू कोते यांच्याकडे पैशाची मागणी केली नाही घटनास्थळी आरोपींना वारंवार सूत्रधार यांचे फोन येत होते दत्तू कोते जास्त वेळ घरी व कार्यालयात नसल्याने कार्यकर्त्यांची धावपळ उडाली व दत्त कोते हे मनसे पक्षाचे जबाबदार पदाधिकारी व नगरसेवक असल्याने त्यांच्या वरून मनसे पक्ष रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करून सूत्रधार यांचा शोध घेण्यास पोलिस प्रशासनाला भाग पाडेल असे लक्षात आल्याने त्यांनी आपण कर्त्यास दत्तू कोते यांना अज्ञात स्थळी सोडून लगेच तेथून निघून जाण्यास सांगितले त्यामुळे मोठा अनर्थ टळला परंतु एक वर्षानंतर शिर्डी येथील काही राजकीय पुढारी गावात चर्चा करताना म्हणत असताना दत्तू कोते यांना एकदा सोडले पुन्हा सोडणार नाही यापुढे जर निवडणुकीत उभा राहिला तर त्याला जिवंत ठेवणार नाही असे अनेक राजकीय गुंड प्रवृत्तीच्या लोकांची चर्चा चालू आहे तरी नगरसेवक दत्तू कोते यांच्या जीवितास धोका असल्या कारणाने त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे व सदर गुंड प्रवृत्तीच्या सूत्रधारा चा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी येत्या आठ ते दहा दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल मग होणाऱ्या परिणामास पोलीस प्रशासन जबाबदार राहील याची संबंधितांनी नोंद घ्यावी.असे निवेदन श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली त्या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सरचिटणीस तुषार बोबडे, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, शहर अध्यक्ष निलेश सोनवणे, मनविसे शहराध्यक्ष विष्णू अमोलिक, उपशहर अध्यक्ष सचिन पाळंदे, उपतालुकाअध्यक्ष अमोल साबणे, भास्कर सरोदे, तालुका संघटक गणेश दिवसे, तसेच मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here