श्रीरामपुर / प्रतिनिधी :- शहरातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतांना विधानसभा सदस्य लहुजी कानडे यांच्या संपर्कात उपनगराध्यक्ष करण ससाणे व काही पक्षाचे पदाधिकारी संपर्कात आले आसल्याचे कळताच त्यांनी स्वतः क्वारंटाईन होऊन त्यांचे स्राव ग्रामीण रुग्णालयाच्या मार्फत नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल ला पाठवण्यात आले होते. त्याचा आज रोजी अहवाल आला असता उपनगराध्यक्षसह ८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे श्रीरामपूरकरांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान श्रीरामपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्याशी श्रीरामपूर टाइम्सने फोन द्वारे संवाद साधला असता ससाणे म्हणाले कि श्रीरामपूर शहरातील अति वर्दळीचा अमरधाम समोरील रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याने,येथून जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागत होता, सदरच्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती व्हावा या मागणीसाठी मी व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह नगरपालिकेच्या विरोधात उपोषण केले होते, लोकप्रतिनिधींच्या कायम संपर्कात असल्याने आम्ही स्वतः वडाळामहादेव येथे कोरंटाईन होऊन कोरोनाची तपासणी केली असता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. श्रीरामपूरकरांच्या सेवेसाठी काम करतांना आम्हाला अभिमान वाटतो, श्रीरामपुरातील जनतेने जे फोन वरून व मेसेज करून आम्हाला धीर दिला यामुळे आम्हाला अजून जोमात काम करण्याची प्रेरणा मिळाली. श्रीरामपूरच्या जनतेने कोरोनाला पळवून लावण्यासाठी प्रशासनाला मदत करून काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here