मेहकर / प्रतिनिधी (चेतन डहाळे) :- जिल्ह्यात कोरोना आजाराने थैमान घातले असुन. कालच पालकमंत्री यांनी बैठक घेऊन जिल्ह्यात सक्तीचे आदेश दिले असतांना. त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत. मेहकर तहसिल कार्यालयातील नक्कल विभागात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. तर स्थानिक मेहकर मध्ये कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण असतांना सुध्दा तहसिल कार्यालय येथे शासनाचे नियम पाळल्या जात नाही तर जनता काय पाळणार ? असे सुज्ञ नागरीक बोलत आहे. जेथुन तालुका स्तरावर टाक्स फोर्स अधिकारी आदेश देतात. त्याच्याच कार्यालयात शिस्त व आदेश पाळल्या जात नसतील तर. आता कारवाई कोणावर करावी. असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांना पिक कर्ज काढण्यासाठी बँकेकडुन फेरफारची नक्कल साठी तकादा लावला जात असल्याने. शेतकऱ्यांना फेरफार नक्कल साठी. मेहकर तहसिल कार्यालयात जावे. लागत आहे. तेथील कर्मचारी वेळेवर फेरफारची नक्कल शेतकऱ्यांना देत नसुन शेतकऱ्यांना आठ ते दहा वेळेस तहसिल कार्यालय मेहकर येथे चकरा माराव्या लागत आहे. मात्र याकडे वरीष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कार्यालयात कायदा फक्त सर्वसामान्य साठीच आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here