श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपुर शहरातील वार्ड नं २ मधील २७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू. मृत युवकाचे नाव हे सोहेल शमसुद्दीन शेख (श्रीरामपूर)असे असुन तो आपल्या टु-व्हीलर गाडीने निमगाव- खैरी कडे जात असताना मागील बाजूने त्याला टेम्पोरिक्षाने धडक दिली असुन ही घटना सुमारे ५ च्या दरम्यान झाली. ज्या गाडीने त्याला उडवले ती गाडी फरार असल्याचे समजते ही घटना गोंधवणी पेट्रोल पंपा जवळ झाली आहे व सरपंच भारत तुपे यांनी शहर पोलिसांना कळविले त्यानंतर श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल हापसे व पोलीस नाईक पवार हे तातडीने घटनास्थळी पोहोचले तसेच मृताच्या नातेवाइकांनी अज्ञात वाहन विरुद्ध श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून अज्ञात वाहन विरुद्ध गुन्हा रजिस्टर ११०२/२०२० नंबर कलम २७९, ३०४(अ), मोटार कायदा कलम १८४ प्रमाणे, १३४ अ ब याप्रमाणे गुन्हा रजिस्टर करून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल हापसे व पोलीस नाईक पवार हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here