श्रीरामपुर/ प्रतिनिधी :- महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानावर हल्ला करून तोडफोड करणाऱ्या समाजकंटक ला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी व राजगृह ल संरक्षण देण्यात यावे अशी मागणी भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप मगर दत्तनगर सरपंच आरपीआय तालुकाध्यक्ष सुनील शिरसाठ सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे यांनी केली व घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी श्रीरामपूर शहर चे पोलीस सहाय्यक निरीक्षक संभाजी पाटील यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह हे आंबेडकरी जनतेचे तीर्थस्थान असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी घर बांधले होते राजगृह ला भेट देण्यासाठी जगभरातील आंबेडकर प्रेमी अनुयायी तेथे रोज येत असतात आंबेडकर जनतेसाठी हे महत्त्वाचे ठिकाण मानले जातात काही माथेफिरूने राजगृह वरील सीसीटीव्ही कॅमेरे ची तोडफोड केली व दगडफेक केली व घराबाहेरील बगीच्याचे नुकसान केले या घटनांमुळे आमच्या भावना दुखावल्या आहे सदरचा प्रकार हा अत्यंत निंदनीय व लाजिरवाणा आहे त्यामुळे सरकारने लवकर आरोपी अटक करावी व कठोर कारवाई करावी व राजगृह ला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी सुनील संसारे सुरेश शिवलकर हिरामण जाधव रामदास रेने कडूबाई पवार अजय शिंदे अमोल काळे बाळासाहेब अमोलिक सचिन खांडरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here