श्रीरामपुर (प्रतिनिधी) :- श्रीरामपुर तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसून येत आहे. आज दिवसभरात चौघांचे अहवाल कोरोना पॉझेटिव्ह आल्याचे निष्पण झाले आहे. यात श्रीरामपुर तालुक्यातील हरेगाव फाटा येथे राहणा-या व्यक्ती अशोकनगर फाटा येथे राहणार व्यक्ती आणि श्रीरामपुर शहरांतील यापूर्वी कोरोना पॉझिटिव आलेल्या अधिकाराच्या घरातील २ जण असे कोरोना पॉझीटिव्ह आढळून आले आहे अशी माहिती आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी नुकताच आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले श्रीरामपुर तालुक्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन आपल्या परीने भरपूर प्रयत्न करत आहे परंतु श्रीरामपूरातील नागरिक ऐकत नसल्याचे दिसून येत आहे घराच्या बाहेर कोणीही पडू नये असे आवाहन तहसीलदार श्री. प्रशांत पाटील यांनी केले आहे.नागरिकांनी या पार्श्वभूमीवर स्वतःची काळजी घ्यावी. तोंडाला मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा तसेच विनाकारण घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here