श्रीरामपूर (प्रतिनिधी):- श्रीरामपूर येथील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले महाले प्रतिष्ठान हे एक नावलौकिक पावलेले असून महाले प्रतिष्ठान संचलित महाले पोदार लर्न स्कूल या सीबीएसई स्कूल मधील विद्यार्थ्यांनी आपल्या घरूनच आपल्या सर्व लाडक्या गुरुना, शिक्षकांना शुभेच्छांचा वर्षाव करणारे व्हिडिओ पाठवून , संदेश पाठवून मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली .
गेल्या साडेतीन महिन्यांपासून कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व लोकडाऊनमध्ये आहे . विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अजूनही शाळा सुरू झालेल्या नाहीत .विद्यार्थी आपल्या घरूनच आपल्या अध्ययनाचे कार्य करत आहेत .शाळेत दरवर्षी गुरुपौर्णिमा ही मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते . मात्र यावर्षी शाळा बंद असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या घरीच सुरक्षित राहून शुभेच्छा देणारे व्हिडीओ तसेच संदेश पाठवून आपल्या ग्रुप विषय असणारी कृतज्ञता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली विद्यार्थ्यांच्या या शुभेच्छांचा वर्षावामुळे गुरुजनांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले .
शाळेच्या प्राचार्य श्वेता गुलाटी यांच्या कुशल नेतृत्वाखाली शाळेतील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाचा मनमुराद आनंद घेऊन आपल्या अभ्यास पूर्ण करत आहेत . नियमितपणे शाळेत विद्यार्थी मोठ्या उत्साहात सण – उत्सव साजरे करत .परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये ही या सण-उत्सव यांच्याशी विद्यार्थ्यांची नाळ जुळलेली असावी म्हणून शाळा विद्यार्थ्यांना विविध सण उत्सवांची ऑनलाइन संवाद साधत असते .
शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती वर्षा आगाशे यांनी सर्व विद्यार्थ्याना शुभ संदेश पाठवून गुरूपौर्णिमेचे महत्त्व विशद केले .आपल्या शुभ संदेशामध्ये वर्षा आगाशे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात मिळणाऱ्या गुरूंविषयी सातत्यपूर्ण कृतज्ञता बाळगण्याची अपेक्षा व्यक्त करून जीवनात बदल घडवून आणण्यासाठी सद्गुरूंची कृपा लागत असते .कठोर परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली असून यामध्ये प्रयत्नवादास खूप महत्त्व असते . गुरु हे आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा दाखवण्याचे अलौकिक असे कार्य करत असतात .शाळेतील विद्यार्थिनी कुमारी निशा मकवाना, श्रीरामपूरची बुलंद तोफ बाल वक्ता कु . लबोणी करपे, आदिती लोंढे ,अथर्व लखोटिया ,सोहम कुदळे ,जय लखोटिया , वैष्णवी शेळके देव पाल ,साईशा सारंगधर , मधुरा हारदे आदी विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला .
अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध हिरे सोन्याचे व्यापारी बंधू संस्थेचे विद्यमान चेअरमन सचिन प्रकाश महाले व सचिव अमोल प्रकाश महाले यांचे मार्गदर्शन लाभले . शिक्षक श्रीकांत लांडे ,कार्यालयीन अधिक्षक आशिष गरुड, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .