बुलढाणा / प्रतिनिधी(चेतन डहाळे) जगभर हाहाकार घालणाऱ्या कोरोनाने जिल्ह्यात देखील चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा ४०० च्या जवळजवळ आला आहे. याला अनेक कारणे असून त्यातील एक कारण म्हणजे कोरोनाची चाचणी करण्यासाठी रुग्णांचे स्वॅब नमुने हे कधी अकोला तर कधी नागपूर, यवतमाळ, अमरावती पाठवावे लागत आहे. त्याठिकाणी अगोदरच खूप नमुने येत असल्यामुळे तपासणीला विलंब होत असल्याने याचीच दखल घेत जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री मा. ना. डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांनी जिल्ह्यातच स्वॅब तपासणी केंद्र (लॅब) सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून रीतसर प्रस्ताव तयार करून राज्य सरकरकडे सादर करून याकरिता लागणाऱ्या एक कोटी १० लक्ष रुपयाचा निधी नियोजन मंडळातून खर्च करण्यास मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या माध्यमातून शासनाकडून त्याला तात्काळ मंजुरात मिळवून घेतली. त्यामुळे आता लवकरच जिल्ह्यामध्ये स्वॅब तपासणी लॅब सुरू होऊन रुग्णांचे अहवाल तात्काळ मिळतील त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविता येणार आहे.
जिल्ह्यासाठी ही फार मोठी दिलासादायक व आनंदाची बाब असून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री मा. ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विशेष प्रयत्नामुळे तात्काळ या लॅबला मंजुरात मिळाल्याने जिल्हावासीयांकडून मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे, पालकमंत्री मा डॉ राजेंद्र शिंगणे यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here