श्रीरामपुर / प्रतिनिधी : – श्रीरामपूर तालुक्यात एका रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या कुटुंबातील काही जणांचे स्त्राव निगेटिव्ह आले.

काही दिवसांनी त्यांना त्रास होऊ लागल्याने पुन्हा तपासणी केल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे निगेटिव्ह अहवाल आला, तरी अशांनी घराबाहेर पडणे धोक्याचे ठरणार आहे.

३० जूनला शहरातील एका अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या कुटुंबातील बारा जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. इतरांचा निगेटिव्ह आला.

काही दिवसांनी दोघांना त्रास जाणवू लागल्याने स्त्राव पुन्हा तपासण्यात आले. ७ जुलैला ते पॉझिटिव्ह आले. अन्य दोघांनाही त्रास झाल्याने त्यांचेही स्त्राव तपासण्यात आले. त्यांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले.

सुरुवातीला लक्षणे विकसित होत नाहीत. मात्र, काही दिवसांनी बाधा होऊ शकते, हे सिद्ध झाले. दरम्यान, सेंट लूक रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्रात १९ जणांवर उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी सायंकाळी प्रथमच चाैघांना घरी सोडण्यात आले. वॉर्ड दोनमधील किमान २०० व्यक्तींचे स्राव घेण्यात येत आहे. शुक्रवारी खोकर व शिरसगाव येथील एक, तर श्रीरामपूर शहरातील आठ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here