इंदुरीकरांचं काम विसरून चालेल का? मनसे नेते थेट इंदुरीकर यांच्या घरी अर्धा तास चर्चा

संगमनेर/ प्रतिनिधी :- मनसे नेते अभिजीत पानसे यांनी इंदुरीकर महाराज यांची भेट घेतली सम तिथीला मुलगा आणि विषम तिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत त्यांच्या विरोधात न्यायालीन खटला सुरू असताना आज मनसे नेत्यांनी भेट घेऊन दोघे महाराजांची चर्चा केली
संगमनेर तालुक्यातील ओझर या गावी अभिजीत पानसे आणि इंदुरीकर महाराज यांची भेट झाली इंदुरीकर महाराज यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली या दोघांनी बंद दाराआड अर्धा तास चर्चा केली इंदुरीकर गुन्हा दाखल झाल्यावर हे प्रथमच भेट आहे म्हणजे इंदोरीकर यांच्या पाठीशी मनसे असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे या भेटीनंतर अभिजीत पानसे म्हणाले एखाद्या छोट्या अनावधानाने केलेल्या वाक्यावरून इतकी टोकाची भूमिका चुकीचे आहे त्यांनी माफीही मागितली आहे इंदुरीकर महाराजांचे कार्य सुद्धा महत्त्वाचे शाळा चालवत आहेत समाज प्रबोधनाचे मोठं काम विसरून चालणार का पक्ष राजकारण यापलीकडे आपण पाहायला हवे इंदुरीकर महाराजांना अटक झाली, तर मनसे रस्त्यावर उतरेल याच अनुषंगाने सदिच्छा भेट घेतली असून सरकारने याबाबत काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे असं अभिजीत पानसे म्हणाले

पुत्रप्राप्तीसाठी केलेल्या विधानावरून इंदुरकर महाराजांवर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला त्यानंतर न्यायालयाने इंदुरीकर यांना येत्या ७ ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत इंदुरीकर महाराजांना आता स्वतः हजर होत वकिलामार्फत आपली बाजू मांडावी लागणार आहे

याप्रसंगी ठाणे/ पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव, वाहतूक नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अनिल झोळेकर, अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सरचिटणीस तुषार बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ संजय नवथर, मनविसे शहराध्यक्ष विष्णु अमोलिक, मनसे शहर उपाध्यक्ष राजु शिंदे, संगमनेर तालुकाध्यक्ष संजय वाणी, शहराध्यक्ष तुषार ठाकुर, अकोले तालुकाध्यक्ष दत्ता नवले, व भारत शिंदे हे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here