कोपरगाव : (प्रतिनिधी) काल दि.१० जुलै रोजी कोपरगाव तालुक्यातील सर्व बाधित व्यक्तीं कोरोना मुक्त होऊन घरी परतले होते व तालुका करोना रहित झाला होता. तसेच आज दुपारी उर्वरित १३ अहवालही निगेटिव्ह आले होते. मात्र कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथिल ४५ वर्षीय पुरुष नाशिक येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये केलेल्या तपासणीत कोरोना बाधित आढळून आला असल्याने कोपरगाव तालुक्यात पुन्हा कोरोनाने एन्ट्री केली आहे.
सदर बाधित व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत असल्याने काही दिवसांपूर्वी त्याचा स्राव कोपरगाव कोव्हीड केअर सेंटर येथे घेण्यात आला होता मात्र तो अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान तपासणी केली असता आज त्यांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सदर बाधित रुग्ण हा ६ जुलै रोजी सुरेगाव येथे येऊन गेला असल्याने बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू असून सदर परिसर सील करण्यात आला आहे.
सदर व्यक्तीच्या संपर्कातील १६ जणांना कोपरगाव येथे इनस्टिटयुशनल क्वारंटाईन केले आहे. त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here