मुंबई ११ जुलै: बिग बी अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना शनिवारी रात्री मुंबईतल्या नानावटी हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनीच ट्विटरवरून दिली आहे. संबंधित सर्वांना याची माहिती देण्यात आली आहे. घरातल्या सर्वांचीही चाचणी करण्यात येणार आहे. गेली 10 दिवस ती सगळी मंडळी माझ्यासोबत होती अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना तातडीने नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
अमिताभ यांच्या जनक आणि जलसा या बंगल्यात राहणाऱ्या सगळ्यांची आता कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. प्रशासनानेे नानावटी हॉस्पिटलबाहेर पोलीस बंदोबस्तही वाढवला आहे. अमिताभ यांच्या चाहत्यांनी गर्दी करू नये यासाठी पोलिसांनी हा बंदोबस्त वाढवला आहे

महानायक अमिताभ बच्चन पाठोपाठ अभिषेक बच्चन देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे.याबाबत अभिषेक बच्चन यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here