कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक व शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. यात नागरिकांच्या हालचालींना प्रतिबंध करणे, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांना आर्सेनिक अल्बमसारख्या औषधींचे वाटप करणे, आपला जीव धोक्यात घालून आशा व आरोग्य सेविकांमार्फत घरोघरी जात कोरोना लक्षणांची तपासणी करणे, संशयित व्यक्तींचे स्राव घेणे इत्यादींचा समावेश आहे. स्राव चे अहवाल येण्यास वेळ लागत असल्याने शासनाकडून रेपीड टेस्ट चे १५० किट उपलब्ध झाले आहेत.त्यापैकी काल दिनांक ११ जुलै रोजी वॉर्ड क्र.2 मधील नगरपालिका शाळा क्र ४ व ५ मध्ये ६० व्यक्तींची तपासणी करण्यात आली, त्यात ४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सदर व्यक्ती कुटुंबियांच्या व समाजाच्या संपर्कात आल्यास कोरोनाचा प्रसार होऊ शकतो म्हणून नियमानुसार त्यांना DCHC( सेंट लूक हॉस्पिटल) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे व उर्वरित ५६ व्यक्तींना घरी सोडून देण्यात आले आहे. *Randomly ६० पैकी ४ व्यक्ती पॉझिटिव्ह येणे* आपल्यासाठी( शहरातील 1 लाख लोकसंख्येचा हिशेब करावा) धोक्याची घंटा आहे,असे असतांना व गेले काही दिवस बऱ्याच प्रमुख सन्माननीय व्यक्तींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असतांना, आज अचानक सदर ठिकाणी काही व्यक्तींनी(प्रतिष्ठित) वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाला रॅपिड टेस्ट करण्यास विरोध केल्याचे व समाजातील लोकांमध्ये या टेस्टबाबत संभ्रम निर्माण होईल अशा स्वरूपाच्या अफवा पसरवत असल्याचे निदर्शनास आले आहे. या अफवांमुळे नागरिक रॅपिड टेस्ट करून घेण्यासाठी येत नाही येत.सदर कृती नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याची,समाजविघातक व शासनाच्या साथरोग प्रतिबंधक उपायांना अडथळा निर्माण करणारी आहे.यामुळे प्रशासकीय यंत्रणेचे मनोधैर्य खचून त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे *माझ्या सर्व नागरिक बंधू-भगिनींनी अशा प्रकारच्या अफवांना बळी न पडता,उद्या आपण अथवा आपले कुटुंबीय कोरोनाबाधित झाल्यास व उपचारास विलंब झाल्यास आपली दिशाभूल करणारी ही तथाकथित “मंडळी” आपल्या उपचारांची,आपल्या कुटुंबाची जबाबदारी उचलणार आहेत का? हा प्रश्न त्यांना एकदा जरूर विचारावा* आणि मगच पुढील निर्णय घ्यावा. या विनंतीसोबतच वैद्यकीय,प्रशासकीय यंत्रणेच्या साथरोग नियंत्रणाच्या प्रयत्नात अडथळा आणणाऱ्या, समाजात अफवा पसरवणाऱ्या प्रवृत्तींना या आवाहनाच्या माध्यमातून सक्त कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात येत आहे.सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या असून यात अनुचित प्रकारे अफवा पसरवल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.”आपल्याला आपले शहर कोरोनापासून जास्तीत जास्त सुरक्षित ठेवायचे आहे” याचा विसर पडू नये ही नम्र विनंती !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here