संगमनेर / प्रतिनिधी : भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्याक्ष तुषार भोसले यांनी रविवारी निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांची संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील घरी त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात दारू दुकानांपासून सर्व उद्योग, व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. परंतू मंदिरे बंद असल्याने हरी लॉक आहे. महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यांतील मंदिरे केंद्र सरकारच्या निर्देशाचे पालन करून भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली. श्रावण महिना सुरू होत आहे. त्यामुळे राज्यातील मंदिरे देखील खुली करावीत अशी आमची मागणी आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना सोडून कुणालाही भेटायला वेळ देत नाहीत. त्यामुळे आम्ही या मागणीसाठी राज्यपालांना भेटलो, असेही त्यांनी सांगितले.

नगर जिल्हातील भुषण समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची भेट घेउन सर्वतोपरी मदत करू किर्तन परपंरा बदनाम करण्याचा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नसल्याचे भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्याक्ष अध्यक्ष आचार्य तुषारजी भोसले यांनी सांगितले. या प्रसंगी भाजपा अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक बबन मुठे,भाजयुमोचे अध्यक्ष सचिन तांबे उपस्थित होते

या बैठकीचे नियोजन अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक बबन मुठे यांनी केले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here