श्रीरामपुर/प्रतिनिधी :- मनसे पक्षाच्या स्थापनेपासून सक्रिय असणारे व सध्या मनसे शहर उपाध्यक्ष पदी कार्यरत असणारे सचिन पाळंदे यांची श्रीरामपूर मनसे शहराध्यक्षपदी आज मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी जाहीर केली त्याप्रसंगी सचिन पाळंदे म्हणाले की येत्या नगरपरिषद निवडणूक पूर्ण ताकतीने लढून मनसेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले त्याप्रसंगी मनसे रस्ते आस्थापना शहराध्यक्षपदी निलेश सोनवणे व महांकाळ वाडगाव येथील राहुल दातीर यांची तालुका उपाध्यक्ष पदी तसेच माळवाडगाव येथील येथील वैभव पवार यांची खैरी निमगाव गट अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आले याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे जिल्हासचिव डॉ संजय नवथर जिल्हासरचिटणीस तुषार बोबडे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप कामगार सेनेचे सरचिटणीस नंदू गंगावणे संतोष मनविसे तालुकाध्यक्ष विकी राऊत मनविसे शहराध्यक्ष विष्णू अमोलिक संदीप पिंटू मनविसे जिल्हा उपाध्यक्ष उदय उदावंत विशाल शिरसाठ ज्ञानेश्वर काळे संदीप विशंभर आधी पदाधिकारी व मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here