माहिती आयोगाचा निकाल श्रीरामपूरातील तक्रारीची दखल नाशिक खंडपीठाचा दणका

श्रीरामपुर/ प्रतिनिधी :- राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाने येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील तत्कालीन जनमाहिती अधिकारी वाय. आर. गाडेकर व तत्कालीन शाखा अभियंता एस. के. भावसार यांना दंड ठोठावला आहे

येथील नारायण औताडे यांनी माहितीच्या अधिकारात सन २०१४ ते २०१६ या कालावधीत मुख्यमंत्री निधी लेखाशीर्ष अंतर्गत झालेल्या कामाची माहिती मागविली होती मात्र ती देण्यात आली नव्हती त्यानंतर औताडे यांनी माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडे या संदर्भात तक्रार केली होती या प्रकरणी झालेल्या सुनावणीमध्ये आयुक्त के एल विष्णोई यांनी माहिती पुरवण्यास सहकार्य न केल्याने गाडेकर यांना रू. २५००० तर भावसार यांना ५००० रुपयांचा दंड ठोठावला

ही रक्कम अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात केली जाणार आहे तसे आदेश संबंधित कार्यालयात देण्यात आले आहेत या दोघा अधिकाऱ्यांच्या आता श्रीरामपूर येथून बदली झाली आहे
भावसार हे येवला तर गाडेकर हे कोपरगाव येथे कार्यरत असल्याची माहिती मिळाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here