श्रीरामपूर (प्रतिनिधी) :- चैनस्नॅचिंग करणारा तडीपार गुंड अटकेत याबाबत अधिक माहिती असे की,
१६/०६/२०२० रोजी दुपारी ३/४५ वा.चे सुमारास फिर्यादी सौ.पुष्पा मच्छिद्र हिरे रा. मोरगेवस्ती, सुवर्णपिंपळ रोड, बॉर्ड नं.७.श्रीरामपूर जि. अहमदनगर या अक्षय कॉर्नर ते सिद्धीविनायक चौक जाणारे रोडवर स्कुटी मोटारसायकलवरुन एकट्या जात असतांना राहिज हॉस्पीटलचे पुढे पाठीमागुन एका काळे रंगाचे मोटारसायकलवर काळपट रंगाचे कपडे घातलेल्या दोन अज्ञात इसमांनी येवून त्यांचे गळ्यातील वरील वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे गंठण बळजबरीने ओढुन तोडुन चोरुन नेले आहे वगैरे फिर्यादीवरुन श्रीरामपुर शहर पोस्टेला गु.र.नं. १ १०४६/२०२० भा. द. वि. क. ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास केला असता तो श्रीरामपुर शहरातील सराईत व तडीपार गुंड आनंद यशवंत काळे याने त्याचा साथीदार सनि भोसले याचेसह केला असुन त्यांनी गुन्ह्यात एक अपाची मोटारसायकल वापरलेली असुन तीसह ते पुन्हा शहरात येणार आहेत अशी बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने डी.बी.पथकाचे पोसई संतोष बहाकर, पोहेकॉ/जे.के.लोंढे, पोकॉ/ अर्जुन पोकळे, पोकॉ किशोर जाधव, पोकॉ/पंकज गोसावी, पोकॉ सुनिल दिघे, पोकॉ/गणेश गावडे,पोकॉ/महेंद्र पवार यांचे पथकाने नॉर्दन बेंच परिसरात सापळा लावुन तडीपार आरोपी नामे १) आनंद यशवंत काळे रा. सुतगिरणी परिसर,दत्तनगर ता.श्रीरामपुर (२) सनि विजय भोसले रा. दत्तनगर ता.श्रीरामपुर यांना ताब्यात घेतले असता त्यांचेकडे एक गुन्ह्यात वापरलेली अपाचे मोटारसायकल नं. एमएच १७ एटी ४६१२ अशी जप्त केली असुन चोरीचे सोन्याबाबत अधिक तपास करत आहोत.
१) आनंद यशवंत काळे रा. सुतगिरणी परिसर,दत्तनगर ता.श्रीरामपुर (२) सनि विजय भोसले रा. दत्तनगर
ता.श्रीरामपुर यांचेवर यापुर्वी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई मा.श्री.अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. डॉ.दिपाली काळे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व मा. श्री. राहुल मदने, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर शहर पोस्टेचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांचेसह पोसई/ संतोष बहाकर, पोसई समाधान सुरवाडे ,तपास पथकाचे पोहेकॉ/ जे.के.लोंढे, पोकों किशोर जाधव, पोकॉ/ अर्जुन पोकळे, पोकॉ। सुनिल दिघे, पोका पंकज गोसावी, पोकॉ/ महेंद्र पवार, पोकॉ/ गणेश गावडे, मपोकॉ/ शितल कांबळे यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here