श्रीरामपुर/ प्रतिनिधी :- मार्च २०२० मध्ये झालेल्या सी.बी.एस.ई. बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये श्रीरामपूर येथील श्रीराम अकॅडमी शाळेचा १००% निकाल लागला असून चि. स्वराज घोडे ९६.८०% गुण मिळवून शाळेत तसेच श्रीरामपूर तालुक्यात प्रथम आला.
कु. ऋतुजा घेर्डे ९५.८०% गुण मिळवून द्वितीय तसेच कु. श्रुती गोऱ्हे ९४% गुण मिळवून शाळेत तिसरी आली. स्वराज घोडे व ऋतुजा घेर्डे या विद्यार्थ्यांनी गणित विषयात १०० पैकी १०० गुण तर श्रुती गोऱ्हे हिने १०० पैकी ९४ गुण प्राप्त केले व इतर सर्व विद्यार्थीदेखील विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.
या भरघोस यशात विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पोटघन मॅडम व शिक्षकवृंद सौ. गोऱ्हे मॅडम, सौ कश्यप मॅडम, सौ कथुरिया मॅडम, सौ गाडे मॅडम,श्री भांड सर, श्री अदमाने सर, श्री पारखे सर, श्री हिवाळे सर, श्री बलराज सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. अशा या यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री. टेकावडे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पोटघन मॅम, शाळेचे ऍडवायजरी कमिटी सदस्य, गवर्निंग कॉउन्सिल सदस्य व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here