श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) गेल्या मार्च महिन्यापासून शाळा कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश शासनाने आजतागायत जाहीर केलेले आहेत .शाळा महाविद्यालय सुरू करण्यासाठी काही पालकांचा होकार असून तर काही पालकांचा सक्त विरोध आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये .विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या हेतूने ऑनलाईन शिक्षण प्रणाली चा वापर करण्यात आला विद्यार्थी आपल्या घरी सुरक्षित राहून ऑनलाइन स्टडीसाठी मोबाईल, लॅपटॉप ,कम्प्युटर आदीं इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करत आहेत . या ऑनलाइन स्टडीमुळे विद्यार्थी मोबाईल लॅपटॉप समोर तासनतास बसत असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खेळण्यावर मोठ्या प्रमाणात बंधने आली आहेत . विशेष करून मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याविषयी पालकांना मोठी चिंता वाटत आहे .पूर्वी पालक व शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवत होते मात्र आता पालक व शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाईल समोर बसून ठेवत आहेत त्यामुळे अनेक शिक्षणतज्ञांनी व पालकांनी केंद्र सरकारकडे याबाबत मार्गदर्शक सूचनांच्या नियमावलीची मागणी केली होती . केंद्रीय
मनुष्यबळ मंत्रालयाने ऑनलाइन शिक्षणाविषयी हे नवीन नियम जाहीर केले आहेत .नियम पुढील प्रमाणे १ ) इयत्ता पहिली ते बारावी या वर्गांसाठी एन सी आर टी ने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाच घेतला जावा . २ ) प्री-प्रायमरी विभागासाठी ठरवून दिलेल्या दिवशीच फक्त 30 मिनिटेच ऑनलाइन शिकवणीवर्ग घ्यावा . ३ ) इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत प्रत्येक दिवशी 30 ते 45 मिनिटांचे दोनच शिकवणीवर्ग असावे त्यापेक्षा जास्त नको . ४ ) इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी 30 ते 45 मिनिटांचे चार शिकवणीवर्ग असावे .
तसेच शाळा-महाविद्यालयातील प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक आदींनीआपल्या विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देऊन , विद्यार्थ्यांनी केलेल्या सकारात्मक कृतीविषयी सुसंवाद साधवा. विद्यार्थ्यांना बोलण्यास ,व्यक्त होण्यास प्रवृत्त करावे . विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन देणे आदीं नियमांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे .

प्रतिक्रिया : श्रीरामपूर विकास गटातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक यांनी वरील नियमांचे तंतोतंत पालन करावे . कोविड -19 प्रतिबंधात्मक उपाय योजना संबंधीचे सर्व नियमावली अंमलात आणावी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी .
मा .श्री . सुनिल सूर्यवंशी साहेब
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती, श्रीरामपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here