श्रीरामपुर/ प्रतिनिधी :-कोरोना संसर्गजन्य रोगामुळे शहरातील रस्त्यावर विविध माल विक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे लॉकडाऊन काळात त्यांच्याकडे असलेले जे काही भांडवल होते तेही या टाळेबंदी मध्ये शिल्लक राहिलेले नाही केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान विक्रेता आत्मनिर्भर निधी पथ विक्रेता विशेष पतपुरवठा सुविधा योजनेची शहरात अंमलबजावणी करण्यात येणार असून रस्त्यावर खाद्य पदार्थ भाज्या फळे विक्रेत्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आव्हान श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक केले आहे

राष्ट्रीयीकृत बँका सहकारी बँक विविध बचत गट मायक्रो फायनान्स यांना रस्त्यावर वेगवेगळ्या मालविक्री करणाऱ्या विक्रेत्यांना खेळते भांडवल म्हणून दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज स्वरूपात रक्कम देण्यात येणार आहे या कर्जाची फेड अनुदान व्याज ७ टक्के असून दर तीन महिन्यांनी चार वेळा व्याज अनुदान जमा होईल सदरची योजना ही ३१ मार्च २०२२ पर्यंत ठेवण्यात येणार आहे या व्यवसायातील सुशिक्षित असलेले व डिजिटल व्यवसायातून व्यवहार करण्यास एक हजार रुपये कॅशबॅक देण्याचे या योजनेत समाविष्ट झालेले आहे

नगरपरिषदेमध्ये नोंदीत असलेल्या रस्त्यावरील जास्तीत जास्त व्यावसायिकांनी या योजनेत सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर परिषद कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आले या बैठकीस नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर डेरे, नगरसेवक श्रीनिवासन बिहानी, नगरसेवक राजेंद्र पवार, नगरसेवक रवींद्र पाटील, कामगार नेते नागेश सावंत, रईस जागीरदार, महाराष्ट्र औद्योगिक कामगार कर्मचारी युनियन मुंबई सहचिटणीस राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here