श्रीरामपूर / प्रतिनिधी(गौरव डेंगळे) :- शास्त्र शाखेत शिक्षण घेणे अवघड मानले जाते. मात्र,शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये बारावीच्या परीक्षेत शास्त्र शाखेत शिकणारी मुले हुशार निघाली आहेत. ज्युनिअर कॉलेज चा शास्त्र शाखेचा निकाल १०० टक्‍के लागला आहे. कुमारी नुपूर ज्ञानेश्वर विखंनकर ८२.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.मागील आठ वर्षापासून
इ १२वी चा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून कु नुपूर विखंनकर (८२.६०टक्के), मोहनजीत बंसल (८०.९२टक्के), करण कुकरेजा (७५.३० टक्के), या विद्यार्थ्यांनी वर्गात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे़.
व्हॉलीबॉल खेळाडू असणारी नुपुर हिला खेळाबरोबर संगीताची देखील आवड आहे. आणि या सर्व आवडी जोपासून तिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला पर्यावरण अभियंता बनायचं आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेत एकूण ४५ विद्यार्थी बसले होते यातील सर्वच सर्व चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष,पदाधिकारी,प्राचार्य तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here