श्रीरामपूर/प्रतिनिधी ( संदीप आसने) :- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासन व प्रशासनामार्फत विविध उपाय केले जात आहेत. त्यानुसार माळवाडगांव येथील शनिवारी भरणारा आठवडे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय कोरोना ग्राम सुरक्षा समितीने घेतला असल्याची माहिती सरपंच बाबासाहेब पा चिडे यांनी दिली आहे.
श्रीरामपूर शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरणा बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने हा निर्णय घेतला असून या निर्णयाचे परिसरातील नागरिक व व्यापारी यांनी पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी व व्यावसायिकांनी आपला भाजीपाला गावात फेरी मारून विक्री करावा,तसेच गावात भाजीपाला विक्री करतांना विक्रेत्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे,असे आवाहन कोरोना ग्राम सुरक्षा समितीने केले आहे.तरि या नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.