श्रीरामपूर/ प्रतिनिधी :- आज श्रीरामपूर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांनामध्ये ७ रुग्णांची वाढ झाली आहे यामध्ये तीन महिला व चार पुरुष असून भोकर मधील १ रूग्ण बेलापूर खुर्द मधील १ रूग्ण गळनिब मधील १ रूग्ण रेव्हेन्यू कॉलनी मधील १ रूग्ण वार्ड नंबर ७ मधील १ रूग्ण मोरगे वस्ती मधील १ रूग्ण अशोकनगर मधील १ रूग्ण असे ऐकून सात जणांचा अहवाल आज पॉझिटिव आला असून अजून १३५ जणांचा अहवाल येणे बाकी आहे आता श्रीरामपूर तालुक्याच्या कोरोना बाधितांचा आकडा ७२ वर केला आहे अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली ज्या ठिकाणी रुग्ण सापडले आहे तो पूर्ण भाग कंटनमेंट झोन म्हणून प्रशासनाच्या वतीने घोषित करण्यात आलेला आहे आता तरी श्रीरामपूर शहरातील नागरिकांनी शासनाचे नियम पाळावे विनाकारण घराच्या बाहेर पडू नये स्वतःची काळजी घ्यावी. तोंडाला मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी श्रीरामपुरातील नागरिकांना केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here