श्रीरामपूर / प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये तीन पक्षाचे सरकार आले त्यानंतर दलित आदिवासी समाजावरील वाढते अन्याय अत्याचाराविरोधात कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना सरकारने केले नाही कोरोना आजाराची भीती दाखवून हे सरकार कानाडोळा करत आहे तसेच महाराष्ट्र राज्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायत मध्ये प्रशासकाच्या नावाखाली आपल्या पक्षाच्या लोकांना पक्षनिधी म्हणून ११००० रुपये जमा करण्याचा फतवा पुणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष यांनी काढला आहे हे घटना विरोधी आहे ग्रामपंचायत आदेशात पात्रतेसाठी कोणत्याही निकष नाही स्वपक्षातील कार्यकर्ते यांना संधी मिळावी म्हणून सर्व उठाठेव चालले आहे पण आमची शासनाला विनंती आहे की आता आपण स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य माजी सैनिक व महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्रदान या व्यक्तींना आता संधी मिळाली पाहिजे इतरांनी आता घरातच बसून राहिले पाहिजे ही आमची आग्रही मागणी असून तरी आपण आपल्या मर्जीतील प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात येत असलेल्या हालचालीचा निषेध म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या टिळकनगर येथील स्मारक याठिकाणी सोशल डिस्टन्स पाळून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संभाजी पाटील व पोलीस कारखिले यांना निवेदन देण्यात आले निवेदन देणे प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे दत्तनगर सरपंच सुनील शिरसाट रांजनखोल चे माजी सरपंच दिलीप त्रिभुवन दत्तनगर ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे हिरामण जाधव व सुरेश शिवलकर माजी सैनिक अनिल लगड शाहीर नरोडे इ उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here