श्रीरामपुर (प्रतिनिधी) :- अहमदनगर जिल्ह्यात आज रात्री ५५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ७८ रुग्णांची नोंद झाली आहे

यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील आज ५० रुग्णांची टेस्ट घेण्यात आली त्यामध्ये ३३ जणांचे रेपिड टेस्ट व १७ जणांचे स्त्राव घेण्यात आले त्यामध्ये ४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले तसेच ८ रुग्ण हे खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालातुन पॉझिटिव आले असून ऐकून १२ रुग्णांची भर पडली आहे त्यामुळे श्रीरामपुर तालुक्याची बाधितांचा आकडा हा ८४ वर गेला आहे अशी माहिती श्रीरामपुर येथील आरोग्य अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी दिली आहे.

यामुळे श्रीरामपूर शहरात वाढत्या रुग्णांची संख्या बघता मागील काळात श्रीरामपुर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी श्रीरामपूर ७ दिवसासाठी बंद ठेवावे असे तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदनाद्वारे मागणी केली असता तहसीलदारांनी काही कारणास्तव बंद ठेवले नव्हते परंतु सद्य परिस्थिती पाहता श्रीरामपूर शहरातील प्रत्येक प्रभागात व ग्रामीण भागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत असल्याने नगराध्यक्षा अनुराधा आदिकांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधून श्रीरामपूर नागरिकांच्या सुरक्षततेसाठी श्रीरामपूर शहर पुन्हा ७ दिवस बंद ठेवण्याचे निवेदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here