रिजवान जहागीरदार-

टिळकनगर (वार्ताहर)-गेल्या दोन महिन्यांपासून छोट्या मोठ्या कारणांनी सतत महावितरण विभागाचा वीजपुरवठा खंडित होणे नित्याचेच झाले आहे. याकडे विद्युत महावितरण गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येते. टिळकनगर परिसरासह दत्तनगर, जवाहरवाडी वाड्या वस्त्यावर रोज दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणने परिसरातील वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करावे अन्यथा महाविरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून तीव्र आंदोलन करू असा इशारा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर सह ग्रामस्थांनी दिला आहे.

वायरमन व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे परिसरात गेले दोन महिन्यांपासून  विजेचा खेळखंडोबा सुरू आहे.  त्रासलेल्या ग्रामस्थांनी येथील वायरमन तसेच अधिकारी यांना विजे संदर्भात विचारणी केली असता ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. ग्रामस्थांशी उद्धट वागताना उडवाउडवीची उत्तरे देतात. वादळ, वारा, पाऊस नसताना तासन्‌तास वीज नसते. कधी कधी रात्ररात्र वीज बंद असते. परंतु महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना संपर्क केला तर योग्य उत्तर मिळत नाही.

तसेच लगद असलेल्या गावातील उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून असल्याने सर्वांना घरासह शेतातही विजेची आवश्‍यकता असते. या लपंडावाने ग्रामीणांना संतप्त करून सोडले आहे. यामुळे येथील नागरिकांत मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. 

प्राजक्त तनपुरे यांच्याकडे उर्जामंत्रीपद आहे. ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यात हे हाल असतील तर उर्वरित महाराष्ट्राने ऊर्जामंत्र्यांकडून काय अपेक्षा करावी. आम्ही अनेकदा ही बाब महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली तरी हा विषय मार्गी लागत नसेल तर आमच्याकडे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे संदीप मगर सह येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

विज अधिकारी तसेच वायरमन यांना सहकार्य करूनही बऱ्याच वेळा वायरमन व अधिकारी गावातच उपलब्ध होत नाही. त्यामुळे या सर्वावर तोडगा काढण्यासाठी व वारंवार उद्भवणाऱ्या विजेच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी संबंधितांना योग्य त्या सूचना करा अन्यथा अधिकाऱ्यांना लाईनवर काम करायला भाग पाडू, असा इशारा शेवटी मगर यांनी  दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here