श्रीरामपुर/प्रतिनिधी :-श्रीरामपूर शहरासह तालुक्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा नव्याने सात कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर शनिवारी बारा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोना रुग्णांची संख्या ८४ झाली.

गुरुवारी कोरोना एकही अहवाल प्राप्त झाला नव्हता. मात्र, शुक्रवारी रात्री सात, तर शनिवारी चार अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात शहरातील चार,

मोरगे वस्ती, अशोकनगर, बेलापूर खुर्द, भोकर व गळनिंब, शिरसगाव, बेलापूर परिसरातील प्रत्येकी एक अशा अकरा रुग्णांचा त्यात समावेश आहे.

यामध्ये भोकर येथील कोरोनाबाधित ठाणे परिसरातून आला होता. बेलापूर खुर्द येथील एक ८५ वर्षांची वृद्ध महिला कोरोना बाधित झाली असून तिच्या कुटुंबातील २२ लोकांचे स्राव घेण्यात आले.

शहरातील तीन पुरुष व एक महिला व शिरसगाव, बेलापूर, गळनिंब येथील पुरुष आहेत. मात्र, शिरसगाव येथील रुग्णाचा अहवाल चुकून डबल आला. त्यातील नऊ जणांचे सरकारी, तर दोघांचे अहवाल खासगी प्रयोगशाळेतून प्राप्त झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here