श्रीरामपुर (प्रतिनिधी) :- श्रीरामपुर शहरातील वडाळा महादेव येथील अजितदादा पॉलिटेक्निकल कॉलेज यांच्या प्रशासनाने असा दावा केला होता की आरोग्य अधिकारी यांनी तेथील कोविडसेंटर न सांगता हलवले त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी तक्रार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे डॉ बाळासाहेब पवार यांनी केली होती याबाबत आमच्या प्रतिनिधी माहिती घेतली असता

यावेळी प्रथम दर्शनी साक्षीदार तोफिक शब्बीर शेख हे वार्ड नंबर २ येथील जे व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली होती तिच्या संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव घेण्यासाठी गेले असतात त्या ठिकाणी अजुन एका कुटुंबातील बारा जणांचे स्त्राव घेण्यात येणार होते त्यावेळी तेथील बॉडीवर असणाऱ्या एका व्यक्तीचा आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांना फोन आला त्यांना सांगण्यात आले की या ठिकाणावरील कोविडसेंटर हलवावे येथेसल सकाळ पर्यंत एक ही व्यक्ती दिसला नाही पाहिजे डॉक्टर त्यांना वारंवार विनंती करून सुद्धा समोरील व्यक्ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती ते फोनवर अरेरावीची भाषा डॉक्टरांसोबत बोलत होते आम्ही ते आमच्या स्वतःच्या कानांनी ऐकले होते आत्ता त्यांच्यावर जे एका वृत्तपत्राच्या माध्यमातून आरोप करण्यात आले आहे ते साफ खोटे असून उलट आमची तर अशी मागणी आहे त्यांनी जो सरकारी कामात अडथळा आणला आहे उलट त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा परंतु म्हणताना चोराच्या उलट्या बोंबा ही परिस्थिती आता उद्भवली आहे अख्या महाराष्ट्र मध्ये डॉक्टरांना कोरोना योद्धा संबोधले जाते परंतु श्रीरामपूर मध्ये त्याचे उलटे पडसाद उमटत आहे डॉ मोहन शिंदे त्यांच्या जागेवर योग्य असून त्यांनी रात्री जो निर्णय घेतला तो आम्हा सर्वांना मान्य होता त्यांनी आमच्या रुग्णांच्या दृष्टीने घेतलेला तो निर्णय योग्य होता आम्ही स्वतः त्यांना तेथील रुग्ण दुसऱ्या कोविडसेंटर मध्ये आणण्यास परवानगी दिली असून तेथील कोविडसेंटर हलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस प्रशासन हा कोविडसेंटर ताब्यात घेतात त्यावेळेस पूर्ण जबाबदारी ही त्यातील प्रशासनाचे असते या पुढे जाता त्या कॉलेजला बॉम्बे नर्सिंग ची मान्यता आहे का? असा प्रश्न मला आहे असेल तर त्यामध्ये कपडे, बेड व अन्य साहित्य यांची विल्हेवाट लावण्याची सर्व सुखसोयी पाहिजे

याबाबत आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here