श्रीरामपुर (प्रतिनिधी) :-  श्रीरामपूर शहरातील आज २ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून बाधितांची संख्या ८६ वर गेली आहे आतापर्यंत ३२५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे ५६९ जणांचे स्त्राव घेण्यात आले त्यामध्ये १४२ व्यक्तीचे अहवाल येणे बाकी आहे शहरातील संत लूक हॉस्पिटल मध्ये ३५ रुग्ण उपचार घेत आहे तर ४२ रुग्णांना विलीनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे आतापर्यंत कोरोनामुळे श्रीरामपूर तालुक्यात ३ जणांच मृत्यू झाला आहे अशी माहिती श्रीरामपुर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी दिली आहे.

बेलापुरातील त्या रुग्णावर गुन्हा दाखल.

शनिवारी बेलापूरातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला होता त्याला श्रीरामपूर येथे बोलावून रॅपिड डेट करण्यात आली होती त्यानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता म्हणून त्याला घरी सोडण्यात आले होते मात्र यावर त्याला कोरन्टाईन केले असतानाही तो गावात फिरला म्हणून त्याच्यावर भादवि कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here