कोपरगाव [प्रतिनिधी] – कोपरगाव शहरातील दुकान मालक व कामगाराचे अपहरण करुन त्यानां दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली

याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रीकृष्ण बबनराव पवार (रा.समतानगर कोपरगाव) अक्रम शफिओद्दीन शेख (रा.दत्तनगर कोपरगाव)अशी अपहरणातील सुटका झालेल्यांची नावे आहेत दरम्यान पोलिसांनी सापळा लावुन शिङीँ येथे चार जणांना अटक करुन मालक व कामगाराची सुटका केली आहे पोलिस सुत्रांची माहीती अशी की कोपरगाव येथिल गांधी पुतळा परिसरातील बालगणेश किड्स वेअर्सचे मालक व या दुकानात कामाला असलेल्या एक कामगाराचे शुक्रवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास स्वीफ्ट कारमधुन अपहरण करण्यात आले त्या नंतर शिङीँ येथे एका हाॕटेल मध्ये त्यानां दोन दिवस डांबुन ठेवत मारहाण केली त्याच्याकडे दहा लाखांची खंडणी मागितल्याचे शनिवारी रात्री उघड झाले त्या नंतर आरोपींना पोलिस निरिक्षक राकेश माणगांवकर सहाय्यक पोलिस निरिक्षक दिपक बोरसे यांच्या पथकाने अटक केली

या प्रकरणी बबनराव बाळाजी पवार (वय ७० रा.समतानगर कोपरगाव) यांच्या फिर्यादी वरुन सचिन राजेद्रं कुसुंदर (रा,लक्ष्मीनगर कोपरगाव) सचिन संजय साळवे (रा.गजानन नगर कोपरगाव) आकाश विजय डाके (रा.गोकुळनगरी कोपरगाव) शुभम केशव राखपसारे (रा.कोर्ट रोड कोपरगाव) यांच्या विरुध्द रविवारी दि. १९/०७/२०२० रोजी पहाटे तिन वाजण्याच्या सुमारास ठाणे अंमलदार सहाय्यक फौजदार शैलेद्रं ससाणे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here