शिर्डी (प्रतिनिधी) :-शिर्डी नगरपंचायत येथील मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचे अपहरण प्रकरणाने आज मोठे वळण घेतले दत्तात्रय कोते यांच्या अपहरणामागील मुख्य सूत्रधार शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष विजय तुळशीराम कोते हेच असल्याने पुढे आल्याने आज विजय कोते यांना पोलिसांनी अटक केली त्यामुळे शिर्डी नव्हे तर नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे याबाबत डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला असता विजय कोते यांच्या अटकेचे त्यांनी दुजोरा दिला

दरम्यान या घटनेची अधिक माहिती अशी की शिर्डी नगरपंचायतीचे मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचे नगर-औरंगाबाद रस्त्यावर एका हॉटेलजवळ रात्रीच्या वेळी अपहरण करण्यात आले होते या अपहरणानंतर दत्तात्रय कोते यांना जीवे मारण्याची धमकी देऊन सोडून देण्यात आले होते त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी कसून तपास करत अपहरण करणाऱ्या तिघा आरोपींना पकडले होते मात्र मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्या अपहरणाचा मागील मुख्य सूत्रधार पकडला जावा अशी मागणी मनसेच्या वतीने काही दिवसापूर्वी अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्याकडे करण्यात आली होती दत्तात्रय कोते यांच्या मुलीने एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली होती त्यात संबंधित अपहरण षड्यंत्र मागील मुख्य सूत्रधारास अटक करा आमच्या कुटुंबाला धोका आहे अशी मागणी केली होती तसेच दत्तात्रय कोते यांच्या वतीने औरंगाबाद उच्च न्यायालयात मुख्य सूत्रधार पोलिसांनी तपास करून अटक करावी अशी मागणी संदर्भात याचिकाही दाखल केली होती दरम्यान पोलिसांनी पकडलेले आरोपी घटना घडलेले ठिकाण व मोबाईल नंबर याचे धागेदोरे शोधत मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्या अपहरणप्रकरणी मुख्य सूत्रधार म्हणून विजय तुळशीराम कोते यांना आज अटक केली या घटनेने संपूर्ण शिर्डीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विजय कोते प्रतिष्ठित राजकारणी व उद्योजक म्हणून ओळखले जातात मात्र आता त्यांना थेट अपहरण प्रकरणात अटक झाल्याने शिर्डीत त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here