श्रीरामपूर (प्रतिनिधी):- याबाबत माहिती अशी की श्रीरामपूर शहरचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट साहेब व तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी अशोकनगर वडाळा महादेव या भागांमध्ये फरार आरोपीचा शोध घेत असताना आंतरराज्य घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगार बबलू मोहन चव्हाण रा. कमालपुर हा त्याच्या साथीदारांसह वडाळा महादेव त्याच्या नातेवाईकांकडे येत असून त्याच्या जवळ पिस्तूल आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने सदर वडाळा फाट्याजवळ सापळा लावून दोन इसमांना निळ्या रंगाचे विना नंबरची एफ झेड गाडीसह ताब्यात घेतले त्यातील बबलू मोहन चव्हाण उर्फ अतिष वय २१ वर्ष राहणार कमालपुर ता.श्रीरामपूर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगा मिळून आलेला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्या त्यांच्याकडे एक गावठी कट्टा मॅक्झिम सह तर एक विना नंबरची एफ झेड एस मोटरसायकल असा एकूण ९००००/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आलेला आहे त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल किशोर सुभाष जाधव यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ११४४/२०२०भारतीय हत्यार कायदा कलम ३ ७ २५ या प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे
बबलू मोहन चव्हाण उर्फ अतिष वय २१ वर्षे राहणार कमालपुर ता. श्रीरामपूर याच्यावर यापूर्वी अनेक चोरीचे व घरफोडीचे गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असून परराज्यात देखील त्याच्यावर गुन्हे दाखल असून तो अनेक गुन्ह्यात फरार आहे
सदरची कारवाई मा. श्री अखीलेश कुमार सिंह साहेब पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा.डॉ. दिपाली काळे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, मा. श्री राहुल मदने उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनखाली श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे तपास पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पोकळे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे, यांनी केली आहे