श्रीरामपुर/ प्रतिनिधी :- फेब्रुवारी २०२० मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएससी बोर्डाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल १५ जुलै रोजी जाहीर झाला असून यामध्ये अहमदनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय सीबीएससी स्कूलचा विद्यार्थी कुमार धैर्य उमेश सूर्यवंशी ९४.८०% टक्के गुण मिळवून शाळेत द्वितीय क्रमांक पटकावला. गणित या विषयांमध्ये त्याने १०० पैकी १०० गुण मिळवले. असे सर्वजण म्हणतात की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी मराठी या विषयांमध्ये कच्चा असतो व त्याला कमी गुण प्राप्त होतात पण
कुमार धैर्य मराठी या विषयांमध्ये १०० पैकी ९९ गुण प्राप्त केले.
त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांमधून त्याचा कौतुक केले गेले व त्यांना शुभेच्छा दिल्या.