श्रीरामपुर (प्रतिनिधी) :- श्रीरामपूरमध्ये आज २२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. आता श्रीरामपूरचा बधिताची संख्या १२४ वर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत ३७० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ६२६ जणांच्या स्त्राव घेण्यात आले त्यामध्ये ११५ व्यक्तींचे अहवाल येणे बाकी आहे. ४४ रुग्ण येथील सेंट लूक हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असून ५७ रुग्णांना विलीनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे तसेच ३ रुग्णांचा मृत्यू देखील झाला असल्याची अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी दिली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२४ पर्यंत पोचली असूनही देखील श्रीरामपूरच्या प्रत्येक रस्त्यावर ,दुकानासमोर कुठल्याच प्रकारची सोशल डिस्टंसिंग बघायला मिळत नाही. कोरोना ची संख्या झपाट्याने वाढत असून प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, मास्क वापरावा व आवश्यक कामासाठी बाहेर पडावे असे आव्हान वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी केले.