तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला रस्त्यावरच निर्वस्त्र अवस्थेत सोडून आरोपी पसार झाला. अहमदनगर शहरातील कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ ही धक्कादायक घटना घडली.

 
अहमदनगरमध्ये तरुणीवर बलात्कार

नगर : अहमदनगर शहरातील कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका युवतीवर वाहनामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२० जुलै) पहाटे घडली. धक्कादायक म्हणजे आरोपीने पीडित तरुणीला रस्त्यावरच सोडून दिले. पीडित तरुणी ही मूळची वर्धा जिल्ह्यातील असून तिच्यावर शिंगवे नाईक (ता. नगर) येथील माऊली सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेत उपचार सुरू आहेत.

माऊली सेवा प्रतिष्ठानच्या डॉ. सुचिता धामणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणाऱ्याविरोधात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी अभय बाबूराव कडू (रा.आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) याला ताब्यात घेतले आहे.

सोमवारी सकाळी नगर शहरातील चांदणी चौक येथे एक तरुणी निर्वस्त्र अवस्थेत धावत असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आली. याबाबतची माहिती त्यांनी माऊली सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेला दिली. त्यानंतर संस्थेच्या डॉ. सुचिता धामणे या तेथे आल्या. तेव्हा त्यांना संबंधित पीडित युवती खूप आरडाओरड करत असल्याचे दिसले. माझ्यावर कडू नावाच्या व्यक्तीने अत्याचार केला, असे ही पीडित युवती म्हणत होती. धामणे यांनी या तरुणीला एका रुग्णवाहिकेतून आपल्या संस्थेत नेले. तिच्यावर त्याठिकाणी उपचार सुरू करण्यात आले. सोमवारी पीडित तरुणीला मानसिक धक्का बसल्याने ती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. काल सकाळी मात्र ती आरडाओरड करू लागली. त्यावेळी डॉ. धामणे यांनी तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता, तिने तिचे नाव सांगून वर्धा जिल्ह्यात राहत असल्याचे सांगितले. तसेच अभय कडू नावाच्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगत तिने सर्व घटनाक्रम सांगितला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here