श्रीरामपुर/ प्रतिनिधी :- श्रीरामपुर तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण वाढत असताना श्रीरामपुर नगरपालिका गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे श्रीरामपुर नगरपालिकेकडे कॉलेज रोड कर्मवीर चौक अशा ठिकाणी स्टेडियम व ग्राउंड असताना सकाळचा बाजार हा लोकवस्ती असलेले ठिकाणी भरताना दिसत आहे जे लोक भाजी घेण्यासाठी येता ते मास्क व सोशल डिस्टन्स पाळताना दिसत नाही आता वार्ड नं २ त्यानंतर वार्ड नं १ मधील दशमेश नगर आदर्शनगर येथील नागरिकांना टार्गेट करनेचा प्रयत्न आहे की काय, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडलेला आहे सर्व सामन्याचा जीव का वेठीस धरत आहे याबाबत नगरपालिका प्रशासन नगराध्यक्ष व भागातील नगरसेवकांनी त्वरीत दखल घेऊन हा भाजी बाजाराची सुविधा दशमेशनगर परिसरातून काडून स्टेडियम मध्ये भरावा अशी विनंती मनसेच्या वतीने करण्यात आली आहे आज रोजी दशमेशनगर परिसर ,आदर्श नगर,वलेशा पथ परिसरात एक ही कोरोना रुग्ण नाही. परंतु नगरपालिकाच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे येथे रुग्ण आढळल्यास त्यास नगरपालिकेला जबाबदार धरून मनसेच्यावतीने नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी यामध्ये काही अनुचित प्रकार घडला तर यांची सर्वशी जवाबदारी ही नगरपालिका प्रशासनाची राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here