श्रीरामपुर / प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील तरुण रवींद्र अरुण पाटोळे यांचा मृतदेह २४/०३/२०२० रोजी बेलापूर पढेगाव रोडवरील कानिफनाथ मंदिरात लगत असणाऱ्या झाडाला फाशी घेऊन लटकलेल्या अवस्थेत गावातील लोकांना दिसून आला लोकांनी सदर घटना बेलापूर पोलीस स्टेशन येथील पोलिसांना कळवली मग पोलिसांमार्फत पाटोळे यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आले त्यानंतर पाटोळे कुटुंब घटनास्थळी जाऊन त्यांनी बघितले की त्यांचा मुलगा झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत होता नेहमी बघितलेल्या व ऐकण्या वरून असे लक्षात येते की फाशी घेणारा हा फाशी घेतल्यानंतर तडफडून डोळे बाहेर येत असतात परंतु रविंद्र पाटोळे यांच्या बाबतीत असे घडले नाही तसेच त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत जमिनीपासून एक विद उंचावर होता फाशी घेतल्या नंतर तडफडून शरीराचे वजनाने सहज पाय जमिनीला टेकले असते त्यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकत नव्हता त्याला जर आत्महत्या करायची होती तर एखाद्या विहिरीत शेजारील नदीत किंवा उंच झाडावर लटकून आत्महत्या केली असती यामुळे त्यांच्या घरच्यांना सदर आत्महत्य नसून हत्या केलेली वाटत आहे हे एक कारण असले तरी

दुसरे कारण असे की तो घरात मोठा असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असल्याने याची जाणीव त्याला होतील म्हणून कष्ट करून घर चालवायचा व करतांना कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवू देत नव्हता त्याच्या घरच्यांवर अपार प्रेम होते तो नेहमी घरात चर्चा करताना म्हणायचा की आपण कष्ट करून चांगले मोठे घर बांधू भावांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना चांगल्या नोकरीला लावून मग मी लग्न करेन असे नेहमी म्हणायचा व इतरही घरगुती गोष्टी करायच्या म्हणून ड्रायव्हिंग मिळेल ते काम करून पैसे तसे तो शरीर सदृढ असल्याने धाडसी स्वभाव असल्याने तो आत्महत्या सारखे पाऊल कधीच उचलू शकत नाही असे म्हणणे रवींद्र चे आई वडील व भाऊ यांच्या आहे

तसेच तिसरी व महत्त्वाचे विषय म्हणजे त्याचे बेलापूर गावातीलच एका मुलीबरोबर प्रेमप्रकरण होते ती मुलगी गावातलीच असून तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम करत होता परंतु श्रीमंत घरातील असल्याचे आम्हाला कळल्यावर आम्ही अनेकदा समजावून सांगितले होते की आपली परिस्थिती मध्यमवर्गीय आहे आपण खालच्या जातीचे आहोत असे त्याला समजावून सांगितले पण घटनेच्या महिन्याच्या अगोदर याची माहिती आली होती तेव्हा मुलीच्या घरच्यांनी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठवून दमदाटी करून भयंकर मारहाण करून पुन्हा त्या मुलीच्या नादाला लागलास जिवंत मारून टाकू अशी धमकी दिली होती अशी मोठी घटना घडून देखील आम्ही शांत राहण्याचे कारण की समोरील व्यक्ती गावातील नामचीन धन दांडगा असल्याने आम्ही शांत राहणे मध्ये आपले भले आहे असे समजून गप्प बसलो परंतु रवींद्र चे प्रेम प्रकरण पुढेही सुरू होते म्हणून असे वाटले ती पहिले मारहाण व धमकी दिल्याने त्यांनी या प्रेमप्रकरणामुळे घातपात घडवून आणली अशी शक्यता नाकारता येत नाही म्हणून रवींद्र याला आत्महत्या करण्यास कोणी प्रवृत्त केले का घातपात झाला याची चौकशी करण्यात यावी व तसेच या घटनेच्या एक महिना अगोदर पासून ते घटना घडेपर्यंत रवींद्र याला कोणी कोणी फोन केले व कशासाठी फोन केले याची देखील कॉल डिटेल माहिती घेऊन चौकशी करण्यात यावी असे या निवेदनात नमूद केले असून सदर निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांना मनसेच्या वतीने देण्यात आले

याप्रसंगी अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सरचिटणीस तुषार बोबडे, जिल्हा सचिव डॉ. संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, तालुका अध्यक्ष सुभाष सोनवणे, शहराध्यक्ष सचिन पाळंदे, रस्ते आस्थापना शहराध्यक्ष निलेश सोनवणे, रस्ते अस्थापना तालुका संघटक गणेश दिवशे, कामगार सेना उपचिटणीस नंदू गंगावणे, मनविसे उपजिल्हाध्यक्ष उदय उदावंत, मनविसे तालुका अध्यक्ष विकी राऊत, मनविसे शहराध्यक्ष विष्णू अमोलिक सुभाष पाटोळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here