श्रीरामपुर (प्रतिनिधी) :- श्रीरामपूरमध्ये आज १४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. आता श्रीरामपूरचा बधिताची संख्या १३८ वर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत ४१८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ६८१ जणांच्या स्त्राव घेण्यात आले त्यामध्ये वार्ड १ चे २ रुग्ण वार्ड नं २ चे ४ रुग्ण वार्ड नं ७ चे ४ बेलापूर १ रुग्ण खंडाळा १ रुग्ण महांकाळ वाडगाव १ रूग्ण प्रभात डेअरी १ रुग्ण असल्याची अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी दिली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३८ पर्यंत पोचली असूनही देखील श्रीरामपूरच्या प्रत्येक रस्त्यावर ,दुकानासमोर कुठल्याच प्रकारची सोशल डिस्टंसिंग बघायला मिळत नाही. कोरोना ची संख्या झपाट्याने वाढत असून प्रत्येकाने खबरदारी घ्यावी व आवश्यक कामासाठी बाहेर पडावे असे आव्हान वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here