श्रीरामपुर/ प्रतिनिधी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच दिवसापासून मार्केट बंद होते अशा परिस्थितीमध्ये हातावरच्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालेल्या असून काल दत्तनगर याठिकाणी १ रुग्ण सापडले या पार्श्वभूमीवर दत्तनगर ग्रामपंचायतीने यांनी तातडीने श्रीरामपूर येथील उपविभागीय अधिकारी अनिल पाटील साहेब व श्रीरामपूर पोलीस स्टेशन यांना पत्र लिहून पुढील चार दिवसासाठी दत्तनगर गाव बंद ठेवावे अशी मागणी करण्यात आली परंतु पूर्ण लॉकडाऊन करणे हा अधिकार जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी व पोलीस स्टेशन यांच्या अधीकारात नसून हा पूर्णपणे अधिकार राज्य शासनाच्या आदेशानुसार गाव बंद करण्याआधी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. स्थानीक प्रशासन संपूर्ण गाव बंद करू शकत नाही. फक्त ज्या ठिकाणी पेशंट सापडला आहे त्या भागातील काही भाग सील करू शकतात याबाबतीत सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ भोसले यांनी अशी मागणी केली आहे की केवळ व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याच्या हेतूने पूर्ण दत्तनगर बंद न करता ज्या भागामध्ये रुग्ण सापडले आहे तो भाग पूर्णपणे सील करून घ्यावे तसेच जो रुग्ण सापडला आहे त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे माहिती घेऊन लवकरात लवकर स्त्राव येऊन त्यांना कोरन्टान केले पाहिजे हे न करता फक्त राजकीय स्टंट म्हणून दत्तनगर गाव बंद करणे विनाकारण व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये माझी व्यापाऱ्यांना विनंती आहे की हा बंद स्वईच्छेने असून ज्यांना कोणाला दुकान चालू ठेवायचे आहे त्यांनी दुकाने चालू ठेवावी परंतु प्रशासनाचे नियम पाळून सॅनिटायझर मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन पाळून दुकाने चालू ठेवावी कोणाला काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ भोसले यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here