राहुरी/प्रतिनिधी : – विजय रणशूर यांच्या डाझगॉन फिल्म्स प्रस्तुत स्रीजातीवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारी इज्जत हा लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटाची संकल्पना व दिग्दर्शन विजू रणशूर यांचे असून कथा, पटकथा, संवाद लेखन सागर साठे यांनी केले आहे. छायांकन व संकलन पंकज देशमुख तर संगीत कीर्ती पराड यांनी दिले आहे. सह-दिग्दर्शक शरद राऊत, सहाय्यक दिग्दर्शक विशाल पगारे असून मेकअप पूनम कदम तर प्रोडक्शन मॅनेजमेंट सतिष साळुंके, युसूफ शा व दीपक जाधव यांनी हाती घेतले होते.
लिनीयर फिल्म्स, मैत्री ग्रुप व डाझगॉन फिल्म्स यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सात दिवसीय अभिनय कार्यशाळे दरम्यान सदर लघुपट चित्रित करण्यात आला आहे. या लघुचित्रपटामध्ये जवळपास ३५ कलाकारांनी नाविन्यपूर्ण भूमिका साकारलेली आहे. “इज्जत” लघुचित्रपटाचा ट्रेलर डाझगॉन फिल्म्स या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रेक्षकांचा अभुतपूर्ण प्रतिसाद या चित्रपटाला मिळताना दिसत आहे. थ्रीडी साउंडसह रोमांचक कॅमेरा अँगल याने प्रेक्षकांच्या मनावर ‘ईज्जत’ची छाप पडेल यात शंकाच नाही. चित्रीकरणादरम्यान वसंत बंदावणे, राजेश जोशी, वंदना बंदावणे, गौरी जोशी, अनिल राऊत, विकास बालोडे, तांबे हॉस्पिटल संगमनेर, शिवण्या मल्टिपल डान्स अकादमी यांचे विशेष सहकार्य लाभले. अशी माहिती दिग्दर्शकांनी दिली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता सिने अभिनेते समीर चौघुले (कोमेडीची बुलेट ट्रेन फेम), शरद जाधव (मुळशी पॅटर्न, घुमा फेम), अपूर्वा चौधरी (सुप्रसिद्ध अभिनेत्री), सौरभ हराळ (विनोदी नाटक अभिनेता), स्मिता प्रभू (गोट्या, झेप फेम), विशाल चव्हाण (सुप्रसिद्ध गायक) ललित खैरनार (मोटीवेशनल स्पीकर) आदींनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे मात्र कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट काही कालांतराने कलावंतांच्या साक्षीने प्रदर्शित करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here