श्रीरामपुर (प्रतिनिधी) :- श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील वार्ड नंबर २ येथे कोरोना येथे साथरुग्ण आढळून आल्या कारणामुळे सर्व भाग दि ४ जुलै २०२० पासून १८ जुलै २०२० कंटेनमेंट झोन म्हणून सिल करण्यात आला होता त्यानंतर या कालावधीत दिनांक २३ जुलै २०२० पर्यंत वाढविण्यात आलेले आहे दिनांक सदरची मुदत दिनांक २३ जुलै २०२० रोजी सायंकाळी ६.०० वा संपत आहे सदर कंटेनमेंट लोन असल्यामुळे सदर भागात अत्यवस्थ रुग्णांना औषध उपचार सुविधा पुरवणे कामी अडचणी निर्माण होत आहे तसेंच सदर भागात दैनंदिन साफसफाई करण्याच्या कामामध्ये नगरपालिकेचे कर्मचारी कंटेनमेंट झोन असल्या कारणामुळे सेवा-सुविधा पुरवणे कामी अडचणीचे होत आहे वार्ड नंबर २ हा भाग फार मोठा असल्यामुळे कंटेनमेंट झोन घोषित केल्यामुळे जेथे रुग्ण नाही अशा नागरिकांना अतिशय त्रास होत आहे वार्ड नंबर २ मध्ये नगरपालिकेच्या ६ प्रभाग असल्यामुळे प्रत्यक्षात ज्या ठिकाणी रुग्ण असतील तिचे इमारत मर्यादित कालावधीसाठी सील करण्यात यावी सदर वार्ड नंबर २ मधील हातावर पोट भरणारे कामगार मजुर वर्ग असल्यामुळे सदर कामगारांना ते कंटेनमेंट झोन मध्ये राहत असल्यामुळे त्यांचे मालक कामावर घेत नाही त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे

तसेच प्रशासनाने कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन संपूर्ण श्रीरामपूर बंद करावे अन्यथा वार्ड नं २ भाग कंटेनमेंट झोन मधुन वगळण्यात यावा वार्ड नं २ बंद केल्याने प्रशासनावर जनतेचा रोश वाढत आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले असून निवेदन देतेवेळी राजेश अलग, रवीशेठ गुलाटी, हाजी मुजफ्फरभाई शेख, हाजी अंजुमभाई शेख, अहमदभाई जागीरदार, हाजी मुक्तारभाई शहा, हाजी साजिद भाई मिर्झा, रईसभाई जागीरदार, ताराचंद रणदिवे, कलीमभाई कुरेशी, सौ समीना अंजुम शेख, मुनीन इमाम पठाण, अकबर पठाण, अनिल इंगळे, आक्सा अल्तमास पटेल आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here