कोपरगाव (प्रतिनिधी) -मधुकर वक्ते :- कोपरगाव शहराची मोठ्या प्रमाणात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता कोपरगाव नगरपालिकेने शासनाकडे पाठपुरावा करत नगरपालिका हद्द काही महिन्यांपूर्वी वाढवली असुन.खुप दिवस होऊन देखील नगरपालिकेच्या वतीने या भागात पूरक अशा सुख सुविधा पुरवल्या गेल्या नाही त्या लवकरात लवकर पूर्ण करून देण्यात याव्या अशा आशयाचे निवेदन आज कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे यांना सामाजिक कार्यकर्ते श्री निसार शेख यांनी दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की कोपरगावा शहराची हद्दवाढ होउन नव्याने सामिल झालेल्या आदिनाथ सोसायटी,कर्मवीर नगर,दुल्हन वार्ड वस्ती,गोकुळ नगरी,सह्याद्री कॉलनी,द्वारका नगरीभीम नगर,शंकर नगर,गवारे नगर या सोबतच इतर समाविष्ट झालेल्या परिसरात रस्ते, गटारी, स्ट्रीटलाईट,तसेच ८ इंची पिण्याची पाण्याची पाईप लाइन पूर्ण करावी अशा मागण्या अनेक वर्षांपासून मी एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी मागणी करत आहे तरी कोपरगाव नागरपालिकेस नम्र विनंती करत आहे की आपण आमच्या या भागातील वरील सुविधाकडे स्वतः लक्ष देऊन त्या पूर्ण कराव्या. असे या निवेदनात सामाजिक कार्यकर्ता निसार शेख यांनी नमुद केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here