सरला बेट/प्रतिनिधी :- योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज १७३ वा अखंड हरिनाम सप्ताहास आजपासून श्री क्षेत्र सरला बेटावर प्रारंभ होत आहे कोरोना च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने पार पडत असलेल्या या सप्ताहाची आवश्यक ती तयारी पूर्ण झाली आहे केवळ ५० जणांच्या उपस्थित साध्या पद्धतीने हा सप्ताह पार पडणार आहे
काल गुरुवारी तालुका प्रशासन पोलीस प्रशासन यांनी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत विद्यार्थी तसेच सप्ताह समितीचे सदस्य असा ५० जणांचा राबता राहणार आहे
आज सकाळी दहा वाजता प्रहार मंडपात वीणा आणि भजन मंडळ यांचे रामगिरी महाराज यांच्या हस्ते पुजन होणार आहे अवघे १० टाळकरी आलटून पालटून २४ तास अखंड भजन गाणार आहे दुपारी १ ते २ या वेळेत महंत रामगिरी महाराज बेटावरील व्यासपीठावरून प्रवचन देणार आहे तेथे छोटा मंडप उभारला आहे
‘लेने को हरिनाम देनेको, देने को अन्नदान, तेरने को लिनता, डुबने को अभिमान’ हे सप्ताहाचे ब्रीद आहे योगीराज गंगागिरी महाराजांनी १७३ वर्षांपूर्वी हा सप्ताह सुरू केला या सप्ताहाची परंपरा कायम राहीली
ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजां पासून या सप्ताहाला मोठी गर्दी होऊ लागली आज सुरू होणाऱ्या या कॉविड- १९ च्या पार्श्वभूमीवर हा सप्ताह अडचणीत आला होता पुष्कळ वर्षाची परंपरा खंडित होते की काय असे वाटत असताना हा सप्ताह छोटेखानी करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र भाविकांना या सप्ताहाला उपस्थित राहता येणार नसला तरी त्यांना सोशल मीडिया, टीव्ही, वृत्तपत्र या माध्यमातून या सप्ताहाचा आस्वाद घेता येणार आहे असे सप्ताहा कमिटी कडून सांगितले जात आहे